"हे राज्य माज्या
शिवरायांचे आहे -
कैलासाच्या माथी जरी शिव शंकर
विराजले,
बघ मराठ्यांच्या कुशीत माझे
शिवराय गरजले,
टाप
मारताच येथे
उधळली
तलवारीची पाती,
येथेच
जुळली
माझ्या मराठा मनाची नाती..
स्वराज्याचा
पुरावा देत आहे
माजा
एक एक कडा,
येथेच
सांडला
गड्या आम्ही शत्रुच्या रक्ताचा सडा,
यवनाच्या
आक्रमनाची याद आहे आजुन
ताजी,
गनिमाच्या
उरावर नाचले माझे
तानाजी
अन
बाजी..
ह्रदयात
माज्या खलखलतात
कोयना
आणि कृष्णा,
मराठा
मनाची आणि मातीची भागीवली त्यानी तृष्णा,
कसा
सांगू लेका उर माजा फुटत आहे,
रायगड
आणि
प्रतापगडी मी तीळतीळ तुटत
आहे..
आफजल्याचा
वाढता बुरुंज काळीज
माज
तोडू
पाहे,
सांगा
ओरडून त्याला हे राज्य
माज्या
शिवरायांचे आहे..."
।।जय
जिजाऊ जय शिवराय।।
No comments:
Post a Comment