या जगात
सह्याद्री सारखा सखा दुसरा कोणी नाही,सह्याद्री सारखा गुरु
दुसरा कोणी नाही ,
पण असा हा भीपरुपी अजिंक्य
सह्याद्री ला माझ्या शिवबा ने हर्षभराने
सह्याद्रीला मिठी मारली.
शिवबाला सह्याद्रीच्या काड्याची कडकडीत
भाषा उमगली, त्यांचे मनोगत
शिवबाला उमगले ,शिवबाचे हरिद
सह्याद्रीला उमगले .....
अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून
सह्याद्रि जन्मास आला.अग्नीच्या धगधगीत
उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र
आहे. पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे
सह्याद्रि.
त्याच्या आवडीनिवडी आणी खोडी पुरूषी आहेत.
त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे. त्यांत
बायकी नाजूकपणाला जागाच नाही. कारण
सह्याद्रि हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे.
अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन्
काळा कभिन्न. रामोशा सारखा. पण मनाने
मात्र दिलदार राजा आहे तो. आडदांड सामर्थ्य
हेच त्याचे सौंदर्य. तरीपण
कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात
सुंदर आणि नाजूक लेणी घातली. त्याच्या अटिव
अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये,
म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर
जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव
पेट्या बांधल्या. त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग
भवानीचा टाक घातला. मनगटात किल्ले कोटांचे
कडीतोडे घातले. सह्याद्रीला इतके नटवले सजवले
तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो !
रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग
घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा !
सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच
तो आवळ आणि रेखीव आहे... .दाट दाट झाडी,
खोल खोल दर्या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे,
उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे,
अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड
लवणे, घातली वाकणे, आडवळणी घाट,
अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य
घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब
सोंडा, भयाण कपार्या, काळ्याकभिन्न
दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा ! असे
आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्रि बिकट, हेकट अन्
हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर
राहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे.
वाघांतहि आहे. कारण तेहि मराठ्यांच्याइतकेच
शूर आहेत...

No comments:
Post a Comment